टायपिंग ची भीती मनात बाळगू नये!
Vijay Bhandare
Clerk 2022
MPSC टायपिंग स्किल टेस्टची तयारी कशी केली? तुमचा दैनंदिन सराव कसा होता?
सुरुवातीला 1 ते 1.5 महिना lesson केले.
त्यानंतर GCC TBC चे typing passage chi practice केली.
हे झाल्यावर आपल्या typing institute वरील speed passage chi practice केली.
दररोज सुरुवातीला 2 तास व शेवटी 4 तास सराव केला.
– तुम्हाला कोणत्या टायपिंग पद्धती सर्वात प्रभावी वाटल्या?
Lesson चांगले करणे खूप महत्त्वाचे आहे. उच्च वेगाने typing करताना अचूकता येण्यासाठी backspace चा वापर बंद केला की आपोआप अचूकता वाढली.
– तुमच्या तयारीदरम्यान किंवा परीक्षेदरम्यान तुम्हाला काही आव्हाने आली होती का?
Speed passage खूप मोठा असल्याने सुरुवातीला थोडी भीती वाटत होती की speed येईल की नाही. पण practice करत करत आली speed.
– टायपिंग परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला आहे?
Lesson चांगले झाल्याशिवाय passage साठी गरबड करू नये. भरपूर practice झाली की speed आणि अचूकता येऊन जाते. आयोगाचा passage जास्त अवघड नसतो. Simple words असतात त्यामुळे typing ची भीती मनात बाळगू नये.